श्री. गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान
जातेगाव बु.||, ता. शिरूर, जि. पुणे, महाराष्ट्र ४१२२०८
Latest News
ध्येयवेड्या ग्रामीण भागातील तरुणांनी सर्वांगीण ग्राम विकासाचे उद्धिष्ट नजरे समोर ठेऊन 'श्री. गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान' जातेगाव बु., ता. शिरूर, जि. पुणे या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य, शेती, इ. क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. गावामध्ये जेमतेम इ. ७ वी पर्यंतच शिक्षणाची सोय असल्याने व पुढील माध्यमिक व उच्च माध्यमिक व अन्य पदव्यूत्तर शिक्षणासाठी शहरी भागाचा रास्ता गावातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना धरावा लागत असे. पिढीजात आर्थिक दारिद्रीपणा, शैक्षणिक दृष्टिकोनाचा पालकांमध्ये आभाव व इयत्ता ७ वी नंतर १०% सुद्धा विद्यार्थी माध्यमिक विद्यालयात दाखल होत नसल्याची खंत विशेषतः आमच्या विध्यार्थी भगिनींचे सामाजिक अडचणीमुळे उच्च कुवत व हुशार असुनही सक्तीचे शेतीकाम, घातक या गोष्टी डोळ्यासमोर जात नसत. त्यासाठी विध्यार्थी भगिनींसाठी किमान माध्यमिक शिक्षणाची सोय करण्याचा दृष्टीने सन १९९७ मध्ये 'श्री. गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान' या संस्थेची स्थापन करण्यात आली.
'एकात्मिक ग्राम विकास' हे संस्थेचे ध्येय आहे. ध्येय प्राप्तीसाठी शिक्षण हे माध्यम आहे. म्हणूनच अथक प्रयत्न करून व सामाजिक विकासाची जाणीव असलेल्या तज्ञ् व्यक्तिजनांच्या मार्गर्दर्शनाखाली संस्थेने छत्रपती संभाजीराजे माध्यमिक विद्यालय सन १९९९ मध्ये शासन परवानगी सह उपलब्ध छोट्या जागेत सुरु केले.
ग्रामीण जीवनाशी व परिसराशी अनुरूप शिक्षण उपलब्ध करून देणे विशेषतः मुलींना शिक्षणापासून वंचित राहू न देणे.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्वंकष विकासासाठी सर्व सामान्य शिक्षण सामान असावे.
ग्रामीण भागातून शहरांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे ओघ थांबवणे व गावातच सामान दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे.
महत्वाकांक्षी मुलांना पुढे येण्यास संधी देणे.
"जेव्हा मी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्येही सर्वोच्च कामगिरी करण्याची क्षमता निर्माण करेल, तेव्हाच मी स्वतःला महान समजेल... राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. याचाच अर्थ असा कि सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षकानं कडून कधीही दुर्लक्षित होता काम नये. मला अ तुकडीचा मिळाली पाहिजे आसा दुराग्रह मुख्याध्यापकांकडे धरणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रपतींनी स्पष्टपणे सुनावले आहे कि जरा १० वी फ कडेही बघा तिथल्या विद्यार्थ्यांना सक्षम करा. अगदी याच नीतिनियमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची वाटचाल सुरु आहे. आजचा विद्यार्थी प्रज्वलित मनाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा ध्यास अंगिकारणारा आणि क्षितिजापलीकडेही एक झेप घेणारा असावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न शिक्षक करत आहेत. शिक्षकाची भूमिका जाणून घेऊन अध्यापनक्षम राहून अव्वल दर्जाचे शिक्षण देण्यास आमचा शिक्षक वृंद कटिबद्ध आहे. देवाच्या पूजेइतकेच शिक्षणक्षेत्र पवित्र असून त्यासाठी अविरतपणे झटण्याची मानस शिक्षकांच्या प्रत्येक प्रयत्नातून जाणवत आहे. त्यांचे पवित्र विचार दैनंदिन आचरण सुसंस्कारित विद्यार्थी माने घडवण्यास उपकारक ठरत आहेत."
Copyright © 2025 SSMV
All Rights Reserved | Powered by WhiteCode